Me Sahyadri August 2020

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
August 2020
Volume 7, number 8, # 98
Mysteries of Lohagadwadi Caves – Part 2
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to Dr, Srikant Pradhan sir, Santosh Alam, Amey Joshi, Saiprakash Belsare, Ninad Bartakke, Ajay Dhamdhere, Abhinav Kurkute, and all those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
 

 

““
 
Me Sahyadri – August 2020
 
मावळ लेणी मोहेमेचा सारांश : मावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. आम्ही चार समविचारी मित्रांनी मात्र या हरवलेल्या लेण्यांची शोधाशोध करण्याचे ठरवले. साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी आणि विवेक काळे असा संघ तयार झाला. एकोणीसाव्या शतकात जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी भारतातील लेणी धुंडाळली. त्यांनी १८८० साली "केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया" या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात मावळातील लहान लेण्यांचा फारसा तपशिल नसला तरी, या मावळातील इतर लहान लेण्यांबद्दल ५-६ वाक्यांमध्ये आम्हाला त्रोटक का होईना माहिती मिळाली. त्यांनी उल्लेख केलेली, काही ठिकाण सापडली, तर काही ठिकाण काहीही केल्या सापडेनात. कदाचित न सापडलेली ठिकाण नष्ट झाली असावीत. पण मोहिमे दरम्यान नविन, ज्या ठिकाणांचा पुस्तकात उल्लेख नव्हता, पण ग्रामीण भागातल्या स्थानिकांना माहिती होती अशी ठिकाण सापडली. जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा धागा म्हणुन वापर करायचे ठरले. कामांचे वाटप झाले.
About the Maval Cave exploration :
The main caves in Maval region are so significant that other small hermit caves are often overlooked. We as a team of four like minded friends, decided to explore the Maval region for these small hermit caves. We explored and found few beautiful places. The very concept of creating a hermit cave somewhere high up in the hills is fascinating. These places often are full of tranquility and nothing else. With very little architectural evidences and clues, the academicians have obviously ignored these places. It was James Fergusson and James Burgess, during their exhaustive study of “Cave temples of India, 1880” mentioned few of these hermits in Maval region of Pune district. With the little clues and exhaustive investigation, team of four members, Saprakash Belsare, Amey Joshi, Ninad Bartakke and Vivek Kale started the exploration. The journey to locate, trek and analyse these hermit caves itself was fascinating. We met many villagers who were unaware of these places, but also met few shephards who were precisely aware of the hermits and gave us tentaive guidance.
 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
1. Map, Maval Region, Pune district, Maharashtra, India
 
मोहिमेत लागणाऱ्या खाऊची सोय करणे, विषय आणि ठिकाणाचा आधी अभ्यास करणे, प्रवासाची सोय करणे, गावकऱ्यांकडे लेण्यांबद्दल चौकश्या करणे, मोहिमे दरम्यान गचपणातुन वाट शोधणे, लेण्याच्या अवशेषांची चित्रे/नकाशे काढणे, छायाचित्रे काढणे, जि. पि. एस. यंत्रावर वाटेबद्दल माहिती नोंदवणे, लेण्यात लहान बारकावे शोधणे, लेण्यांचे विश्लेषण करणे, नोंदी करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची काम वाटुन घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जाताना, घरचा अभ्यास करावा लागला. जुनी पुस्तके, नकाशे धुंडाळले गेले. गावातल्या मित्रांची मदत झाली. गडद, लेणे, गुहा, कपार, भोगदा, विहार, पांडवांनी एका रात्री बनवलेली गुहा असे अनेक शब्द वापरुन चौकश्या झाल्या. बहुतेक वेळा असे काही नाही इथे ! तुम्ही कुठुन आलात ? असे उत्तर मिळाले. लेणे आहे का इथे कुठे असा प्रश्न विचारला तर आम्हाला बहुतेकांनी कार्ले/बेडसे/भाजे लेण्यांचा पत्ता दिला. पण बकऱ्या, गाई घेऊन डोंगरात फिरणारे गुराखी मात्र दरवेळेला मदतीला धाउन आले. वाटांचे आणि दिशांचे अंदाज मिळाले. जुजबी माहिती घेऊन ठिकाण शोधणे या प्रकाराचा चांगला सराव झाला. कधी काटेरी करवंदींच्या खालुन खुप सरपटाव लागल तर कधी घसाऱ्यावर हात टेकावे लागले. लेण्यांमध्ये मोठे कोळी (स्पायडर), कातळ पाली, वटवाघळ, मधमाश्या, पाकोळ्या, घुबडं भेटले. आमच्या मुळे त्यांना उगाच त्रास झाला, असा अपराधीपणा वाटला. प्रत्येक शोधमोहिमेला यश आलेच असे नाही. काही ठिकाण सापडली नाहीत. तर काही ठिकाण आमच्याच मनाचे खेळ आहेत असे लक्षात आले. बहुतांश ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखिम होती. वटवाघळ, लेण्यातील धुळ, काळोख, मधमाश्या, काटेरी वनस्पती, घसारा, गुहेतील ऑक्सिजन चा अभाव आणि इतर न दिसणारे धोके यावर मात झाली. एकूण मिळुन २० नविन अपरिचित ठिकाण/वास्तु पहायला मिळाल्या, मावळाचा भुगोल जरा अजुन नीट लक्षात आला. नविन प्रश्न पडले आणि नविन कोडी सोडवयाला मिळाली. तर्क वितर्क झाले. .
There is a very brief mention about the misceleneous caves of Maval by James Fergusson and James Burgess in their work. Based on available information we decided to search these caves and monuments. The activities were planned. The food, travel , track exploration in difficult and routes full of foliage, enquiring the villagers about the caves, taking measurements and drawing skecthes and maps, photography, GPS data collection, making notes and analysing the information, observing the minor details of the caves etc activites were distributed amongst the team members. We met many bats, owls, geckos, lizards, large spiders, martins, honeybees during the treks. Often we felt sad that we disturbed them to see the caves. Most of these places are hazardous due to pitch darkness, bats, dust, thorny plants, honeybees, low oxygen level in caves and rock patches etc. Not all the attemps were successful. Sometimes we could not find the intended places and sometimes we realised that the cave was just our imagination and did not exist. Nevertheless we saw about 20 new strange lesser caves/monuments during the exploration.
 

 

 
2. Map of Maval region, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
दोन हंगामांच्या शेवटी, आम्ही डेक्कन महाविद्यालयातील डॉ. श्रीकांत प्रधान सर यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी त्यांनी काही वर्षांपूर्वी मावळ प्रदेशातील लेण्यांचा मागोवा घेतला होता. भविष्यातील कामासाठी त्याच्याकडून मार्गदर्शन घेताना त्यांनी आम्हाला लोहगड पाहण्याची सूचना केली. लोहगड येथे असलेल्या काही भुयारी लेणीविषयी आम्हाला काही कल्पना होती. लोहगड आमच्या लेणी शोध मोहिमेत कधीच नव्हता. आम्ही लोहगड चा अभ्यास सुरू केला. आम्हाला लवकरच लोहगड लेणीना भेट देणे हे वाटते तेवढे सोपे नाही हे लक्षात आले. आम्ही जेष्ठ गिर्यारोहक अजय ढमढेरे काकांची मदत घेण्याचे ठरविले. सुरक्षित भेटीसाठी उन्हाळा सर्वात योग्य हंगाम असल्याने आम्ही नेहमीप्रमाणे उन्हाळ्यापर्यंत धीर धरुन थांबलो. एकाच भेटीत कोणताही लेणी संकुल समजू शकत नाही. यासाठी अनेक भेटी आवश्यक असतात. २०१९ च्या उन्हाळ्यात आम्ही लोहगड किल्ल्याच्या भेटीची योजना आखली. भेट सुलभ आणि जोखीम मुक्त करण्यासाठी, विविध जोखिमांवर तोडगे काढले गेले. मधमाश्यांचा हल्ला आणि दरड कोसळल्यामुळे होणारी संभाव्य घातक दुखापत या लोहगड लेणींना भेट देण्यात असलेल्या मुख्य जोखिमा आहेत. त्याशिवाय वटवाघळे, साप, विंचू यांच्याकडुन असलेला धोका आहे. २०१९ च्या उन्हाळ्यात सर्व तयारी करुन आम्ही लोहगडवाडीला पोहोचलो.
At the end of couple of seasons, we visited Dr. Shrikant Pradhan sir from Deccan college and discussed our findings with him. In the past, few years back he had explored Maval region caves. While taking guidance from him for the future work, he suggested us to have a look at Lohagadwadi. Though we had some faint idea about some tunnel caves at Lohagadwadi, Lohagadwadi was never on our cave exploration plan originally. We started Lohagadwadi study. We soon realised that the visit to Lohagadwadiwadi caves involves high risk due to various factors. We decided to take help of experienced trekker, Ajay Dhamdhere. As usual we waited till summer patiently, as summer is safer and the most appropriate season for cave exploration. No cave complex can be understood in one visit. It requires multiple visits. In summer of 2019, we planned the visit to Lohagadwadi fort. All the past learnings were applied to make the visit easy and risk free. The major risks at Lohagadwadiwadi caves visit are honeybees and injury due to rockfall, apart from other typicals risks in caves from bats, reptiles etc. One fine summer day all the team members (Amey Joshi, Saiprakash Belsare, Ninad Bartakke, Ajay Dhamdhere, Abhinav Kurkute and Vivek Kale, gathered at Lohagadwadiwadi.


 

 

 
3. Map, Lohgad Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लोहगडवाडी लेणी समूह लोहगड डोंगरावर आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, लोहगड किल्ला पुणे शहरापासून अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे. लोहगडवाडी लेणीसमुहातील लेणी, विहार आणि पाण्याची टाकी पहाता, लोहगडवाडी लेणीसमुह मावळातील एक मोठा लेणीसमुह आहे असे लक्षात येते. दक्खन च्या पठारावर सह्याद्रीच्या विसापुर डोंगररांगेत लोहगडवाडी लेणी समूह आहे. विसापुर डोंगररांग पश्चिम घाटातील कुरवंडे गावापासुन पूर्वेला घोरावडेश्वर (शेलारवाडी) डोंगरापर्यंत ३५ किमी पसरलेली आहे. विसापुर डोंगररांगेत, भाजे लेणी, बेडसे लेणी, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला ही महत्वाची ऐतिहासिक वारसा स्थळ आहेत. कार्ले आणि विसापुर डोंगररांगांच्या मध्ये असलेल्या पठारी प्रदेशातुन इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी पश्चिमेकडुन पूर्वेकडे वाहते. प्राचीन व्यापारी मार्ग या भागातुन इंद्रायणी खोऱ्यातुन जातो. हा प्राचीन व्यापारी मार्ग कोकणातल्या कल्य़ाण, सोपारा या बंदरांपासुन दक्खन च्या पठारावरच्या पैठण, तेर या गावांना जोडत होता. आज याच भागातुन मध्य रेल्वे आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग जातात. विसापुर डोंगररांगेच्या दक्षिणेला पवना नदीचे खोरे आहे. या खोऱ्यात बेडसे, तिकोना , येळघोळ, लोहगडवाडी आणि खडकवाडी येथे लेणी आहेत. इंद्रायणी आणि पवना खोऱ्याच्या मध्ये लोहगड डोंगर आहे. लोहगड डोंगराच्या आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. लोहगडवाडी लेणी समूहात असलेल्या विविध लेण्यांची संरचना, येथे असलेला शिलालेख आणि इतर पुराव्यांवरून हा लेणीसमूह इसवीसनाआधी अंदाजे पहिल्या शतकात कोरला असावा असा अंदाज आहे.
Lohagadwadiwadi cave complex is located on Lohagadwadi fort hill. Lohagadwadi fort is located in Maval tehsil in Pune district in Maharashtra state in India, at about 60 km north west of Pune city. The hill is part of the extension of the Visapur sahyadri hill range on the Deccan plateau. Spread in west–east orientation, this hill range, which is about 35 kilometer in length, spread from the Kurwande village at western ghat ridge, south of Lonavala up to the Ghoravadeshwar hills towards east. Visapur fort, Lohagadwadi forts, Bhaje Caves and Bedse caves are located in this hill range. This hill range is referred as Visapur range. Between Karle range and Visapur range, Indrayani river flows from west to east, and the plateau is called as Indrayani basin. Indrayani river originates in the hills around Lonavala. The ancient trade route climbs up the western ghat ridge from the Konkan over to the Deccan plateau at Lonavala. Once atop Deccan plateau at Lonavala, the trade route is aligned parallel to Indrayani river. This ancient trade route was used to transport the goods from the eastern economic centers on the Deccan plateau to Kalyan and Sopara ports on the west coast of India. Today the modern Mumbai-Pune road and Central railway line passes through the same Indrayani river basin, which was used for ancient trade in the past. South of Visapur range there is a Pawana river basin, which is also the fertile region with caves located at places such as Bedse, Yelghol, Lohagadwadiwadi, Khadakwadi, and Tikona. Lohagadwadi is located between Indrayani river basin and Pawana river basin. Both the trade routes coming via Pawana basin and Indrayani basin are connected via a pass along rither sides of the fort. The hill is surrounded by fertile land. Based on archeological, paleographical and other evidences the the oldest cave complex at Lohagadwadiwadi is estimated to have been carved in 1st century BC. Based on the number of exacavations it is one of the largest cave complex in Maval region. This visit to all the caves at Lohagadwadi many previously unknown aspects of this cave complex.
 

 

 
4. Lohgad fort, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
5. Steps to Cave 2 and 3, Lohagadwadi caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
गायमुख खिंड ते विंचू काटा हे अंतर कड़्याच्या खालुन पार केल्यानंतर, पुढचा टप्पा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत मजल मारणे हा होता. या पश्चिम कड़्यालगत ची पायवाट दुर्गम आहे. वाटेत असंख्य ठिकाणी मधमाश्यांची पोळी असतात. या बाजूला कड़्याखाली गुहा नाहीत. एका ठिकाणी वाट तुटते. खालच्या रानात एका ठिकाणी वाघजाई चे ठाणे आहे. येथुन आडव्या वाटेने लोहगडच्या पायरीमार्गापर्यंत जाता येते. पायरीमार्ग ओलांडल्यावर कड़्याच्या खाली एक लेणी समुह आहे. या पूर्व कड्य़ाखाली असलेल्या लेणी समुहात एकुण ९ लेणी/टाकी आहेत.
After completing the circumlocution of Lohad cliff from Gaaymukh khind to Vinchu Kataa end, we decided to move forward. The path between Vinchu Kataa and the main entrance of the fort has again many honeybee hives. There are no caves or water cisterns on this path. The path is broken in the end. One has to come down to the lower level to traverse the cliff. There is a Waghjaai deity in the forest below the cliff. After visiting the deity we moved forward to the main entrance. After crossing the main entrance stairways we reached the east facing cliff of the Lohagad fort. Here there is a series of caves and water cisterns and is refered here as Cluster 1.
 

 

 
6. East Cliff, Lohagadwadi caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
7. East Cliff, Lohagadwadi caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
8. East Cliff, Lohagadwadi caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
कड़्याच्या खाली पायरीमार्ग ओलांडल्यावर उत्तरेकडे एक लेणी समुह आहे. या पूर्व कड्य़ाखाली असलेल्या लेणी समुहात एकुण ९ लेणी/टाकी आहेत. समोरच खाली लोहगडवाडी गाव वसलेले आहे. हा लेणी समुह या लेखात लेणी/टाकी गट क्रमांक १ असा संबोधिला आहे. या लेणी समुहात काही टाकी आणि काही लेणी आहेत. यातील काही लेणी कड़्यात पायवाटेच्या लगत न कोरता वरच्या पातळीत उंचावर कोरल्या आहेत. या लेणी समुहात एकुण तीन स्तर आहेत.
Description of Cluster 1 excavations Immediately next to the stairway, few feet away there is a series of caves and water cisterns and is refered here as Cluster 1. There are total 9 excavations in this cluster. These 9 excavations include both caves and water cisterns. Some of the caves in this complex are at higher levels as compared to other caves, making it a triplex complex.
 

 

 
9A. East cliff and its caves, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
10. Cave # 1, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक १ :
स्थान आणि वर्णन : लेणी क्रमांक १ (लेणी गट १) जमिनीगत असलेली एक लहान लेणी (मोठा कोनाडा) आहे. या लेण्याची रुंदी अंदाजे १.८ मीटर आणि आत लांबी अंदाजे १.८ मीटर आहे. तर उंची अवघी अंदाजे १.२ मीटर आहे. या मोठ्या कोनाड़्यात अजुन एक लहान कोनाडा आहे. या लहान कोनाड़्याचा आकार अंदाजे ०.७ मीटर रुंद, आत ०.५ मीटर लांब आणि ०.९ मीटर उंच आहे. या लहान कोनाड़्यासमोर एक लहान पायरी आहे. या कोनाड़्यात इतर कोणतीही चिन्हे किंवा लेख नाही. पूर्वी या कोनाड़्यात कदाचित एखादया देवाची मूर्ती असावी. आज मात्र या कोनाड़्यात मूर्ती नाही. या कोनाड़्याकडे पाहुन असे वाटते की या लेणीसमुहात रहाणाऱ्या पंथाचे अनुयायी मूर्तीपुजा करत असावेत.
Excavation#1 Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, North of main Fort stairways, at the elevated level, near Lohagadwadi village. Description: Excavation#1 is a small rock cut cave/recess with a small recess (niche) in its backwall. The cave is facing east. The cave is approximately 1.8 meter wide and 1.8 meter deep with ceiling reaching to the height of 1.2 approximately meter. Inside this small cave there is a small empty recess (niche) in its backwall. The small recess (niche) is approximately 0.7 m wide, 0.5 m deep and 0.9 meter in height. There is a small step below the recess. There are no symbols or inscriptions in this cave. There must have been idol of some god in this niche in the past. But today the niche is empty without any idol. This niche indicates that the cave complex was probabaly habitated by a idol workshipers.
 

 

 
11. Cave # 1, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
12. Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
13. Cliff with Cave # 2,3, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
14. Cliff with Cave # 2,3, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
15. Cliff with Cave # 2,3, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
16. Steps to Cave # 2,3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
17. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी/टाकी क्रमांक २ :
स्थान आणि वर्णनः लेणी क्रमांक १ च्या उत्तरेला एक लहान नाळ आहे. त्याच्या बाजुला जमिनीच्या पातळीवर अंदाजे २० फूट उंचीवर एक पाण्याची टाकी आहे. येथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या असाव्यात. आता मात्र कड़्याची पडझड झाल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या काही पायऱ्या तुटल्या आहेत. पाण्याची टाकी १.८ मीटर रुंद, २ मीटर आत लांब, आणि १ मीटर खोल आहे. या टाकीचे मुख अंदाजे ०.८ मीटर लांब आणि ०.४५ मीटर रुंद आहे. मुखावर झाकण अडकवता यावे यासाठी याला खाचा आहे. टाकीच्या मुखावर असलेला कड़्यात कोरलेला आडोश्याच्या एका कोपऱ्यात एक लहान कोनाडा आहे. टाकीच्या समोरची बाजू फुटलेली आहे/फोडलेली आहे. त्यामुळे या टाकीत पाणी राहू शकत नाही. टाकी फुटलेली असल्यामुळे याचा एक कक्ष म्हणून वापर झाला असावा. या ठिकाणी जाणे धोकादायक असल्याने येथे सुरक्षित पणे जाण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. पाण्याच्या टाकीच्या चौकोनी मुखाभोवती असलेली खाच लाकडी झाकण ठेवण्यासाठी केलेली आहे. याच प्रकारची पाण्याच्या टाकीच्या चौकोनी मुखाभोवती असलेली खाच पाले लेणी मध्ये पहावयास मिळते. टाकी एवढ्या वर कोरण्याचे कारण काय असावे ? लेणी क्रमांक ३ मध्ये वास्तव्यास असणाऱ्या भिक्षूकांसाठी ही टाकी कोरली असावी.
Excavation#2
Location : Cluster 1, Lohagadwadi Caves, north of the Excavation#1, at the elevated level.
Description : Excavation#2 is a rock cut water cistern at higher elevation in the cliff. The cistern is not easily acessible; the steps to aceess the water cistern in the cliff face are partly missing. The cistern is a box type excavation and is approximately 2 meter wide, 1.8 meter in breadth, with visible vertical depth of 1 meter. As the cistern is filled with the rubble, the exact depth can not be ascertained. Above the cistern there is an access chamber, where the mouth of cistern opens. There is a opening in the floor of this access recess which opens in the ceiling of the water cistern. The opening is about 0.8 m wide and 0.45 m in breadth. There is a rectangular recess around the opening as if to cover the opening by using the wooden cover. However this cistern seems to have been modified. The front side wall of the water cistern has been cut open, making the original water cistern defunct. The access chamber at the top of the water cistern has a small recess (niche) at one of its inner corner. The niche must have been used to keep the idol of some deity. It is interesting to see that the niche for deity is near the water cistern. This broken water cistern is located adjascent to the steps going to Excavation#3. There are no symbols or inscriptions in this cistern.
The way the recess has been created on the mouth of water cistern for laying the wooden cover is similar to the recess which has been created on the mouth of water cistern at Pale caves in Maval. The reason why this water cistern is made at higher elevation is also a question. This water cistern was probabaly made to serve the water requirement of the cave#3 dwellers. As the approach to this water cistern is broken, one should be very careful while visiting this water cistern.
 

 

 
18. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
19. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
20. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
21. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
22. Water cistern # 2 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
.
 

 

 
23. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक ३ : लेणी/टाकी क्रमांक २ च्या वर कड़्यालगत असलेल्या तुटक्या पायऱ्या वर चढुन गेल्यावर आपण एका मोठ्या लेणीच्या ओसरीत पोहोचतो. या दिड फूट रुंद पायऱ्या जागोजागी तुटल्या असल्याने येथे जाणे अत्यंत जोखिमेचे आहे. खालच्या जमिनीपासून लेणीची उंची ३५-४० फूट असल्याने सराव असल्याशिवाय येथे जाऊ नये. प्रांगणात एक मोठी ओसरी आहे. ओसरीच्या एका बाह्य कोपऱ्यात पाण्याची टाकी आहे. या ठिकाणी खुप दरड कोसळली असल्याने टाकीच्या अंतर्भागाचा नीट अंदाज घेता येत नाही. ऒसरीचा आकार अंदाजे ७ मीटर रुंद आणि ३.५ मीटर आत लांब आहे. ओसरीच्या मागच्या भिंतीत एक दरवाजा आहे. या दरवाज्याबाहेर ओसरीत दोन बाजुला दोन अशा इंग्रजी "एल" आकाराच्या दोन बैठका आहेत. बैठका खुप रुंद (अंदाजे १ मीटर) आहेत. तसेच याची उंची अंदाजे ०.४ मीटर आहे. एवढ्या रुंद आणि एवढ्या ठेंगण्या बैठका इतरत्र क्वचितच पहावयास मिळतात. अशा बैठकांवर बसल्यावर, पायाचे तळवे जमिनीवर टेकतात. हा त्यांच्या कमी उंचीचा फायदा आहे. मात्र रुंद बैठक असल्याने पाठ मात्र मागे भिंतीला टेकत नाही. एखाद्या मुख्य भदंताला भेटायला आलेले उपासक, शिष्य येथे ओसरीत बैठकीवर बसत असावेत. ओसरीत एका वेळेस अंदाजे ८-१० माणसे या बैठकीवर बसु शकतात. ओसरीच्या भिंती छन्नीने छान सपाट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्या येथील इतर लेणींच्या भिंतींसारख्या फार ओबड धोबड नाहीत. या भिंतींवर पूर्वी गिलावा दिलेला असावा. आज मात्र गिलावा अस्तित्वात नाही. ओसरीच्या मागच्या भिंतीत एक दरवाजा आजे. दरवाजाची उंची १.५ मीटर असुन त्याची रुंदी ०.९ मीटर आहे. दरवाजातून आत गेल्यावर आत एक मोठे दालन आहे. दालनाचा आकार अंदाजे ४ मीटर रुंद आणि ४ मीटर लांब आहे. उंची अंदाजे २ मीटर आहे. उत्तर भिंतीत एक लहान कोनाडा आहे. दालनाच्या छतावर जुना गिलाव्याचे थोडे तुकडे दिसतात. मागच्या भिंतीत अजुन एक लहान (कक्ष) विहार आहे. या विहाराचा आकार अंदाजे २.८ मीटर रुंद आणि २ मीटर लांब (आत) आहे. या विहारात आत बाक नाही. दक्षिणेकडील भिंतीत अजुन एक लहान (कक्ष) विहार आहे. या विहाराचा आकार अंदाजे २.७ मीटर रुंद आणि २.३ मीटर लांब (आत) आहे. या विहारात आत बाक नाही. या एकूण लेणीची संरचना पाहता ही लेणी बौद्ध लेणी वाटत नाही. येथील विहारांचे आकार, ओसरीतल्या बैठकांची रचना या भागातल्या इतर लेणी संरचनेपेक्षा फार वेगळी आहे. संपूर्ण लेणी समूह किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असल्याने येथे एखादी राज्यव्यवस्था चालवणारी व्यक्ती रहात असावी असे सुद्धा वाटत नाही. एखाद्या धार्मिक आस्थापनाने येथे लेणी वापरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तसा पुरावा मात्र या लेणी क्रमांक ३ मध्ये उपलब्ध नसल्याने या लेणीचे गुढ अनाकलनिय राहते. लेणी एवढ्या वर का कोरली असावी हा अजुन एक प्रश्न आहे.
काही कारणे :
१) कदाचित खालच्या स्तरांवरील जागेत लेणी क्रमांक ४,५,६ आधीच अस्तित्वात असल्याने जागा नसल्याने लेणी २,३ वरच्या पातळीत कोरल्या असाव्यात.
२) खालच्या पातळीत दोन ठिकाणी संपूर्ण कातळ कड़्यात सलग भेगा आहेत. त्या भेगांपासून अंतर राखण्यासाठी (लेणीत पाणी येऊ नये म्हणून) लेणी २,३ वरच्या पातळीत कोरल्या असाव्यात.
३) लेणी मुद्दामुन सुरक्षिततेसाठी किंवा अलिप्ततेसाठी वरच्या पातळीत कोरल्या असाव्यात.
Excavation#3
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, north of the Excavation#2 at the further elevated level.
Description: Excavation#3 is a rock cut cave at higher elevation in the cliff. The cave is not easily acessible. The steps to aceess the cave are partly broken and partly missing. The cave has a verandah. The verandah does not have front wall. Verandah is approximately 7 meter wide and 3.3 meter deep. There is a water cistern on the right front corner of the verandah. The front portion of the ceiling of the cistern has collapsed. There are two L shaped wide benches in the verandah. Benches are about 1.1 meter deep and 0.45 meter high. The benches are located one each on the either side of the doorway at the backwall of the verandah. The doorway which is approximately 1.5 meter in height and 0.9 meter in width, opens in to a small cave hall approximately 4 m wide and 4 m deep. There is a small niche in the north wall of the cave hall. On the backwall of this cave hall, there is a cave cell which is approximately 2.8 m wide and 2. m deep with 1.96 m height to the ceiling. On the south side wall of this cave hall, there is a cave cell which is approximately 2.7m wide and 2.3 m deep with 1.9 m height to the ceiling. The doorway to this cell is approximately 1.5 meter in height and 0.9 meter in width. There are remains of plaster on few walls of this cave. There are no symbols or inscriptions in this cave. The bench in the verandah of this cave are short in height and wide in the width atop. Such benches are normally not seen in typical Buddhist caves. Though these benches give comfort to the feet as the feet rest on the floor due to the short height, the bench due to its large width, do not give the back rest, unless someone sits in padmasana. The verandah with its benchs looks like a waiting room. The cave complex is completely outside the fortification of the Lohagad fort. So the purpose of the cave complex for the defence purpose may be ruled out.
Why these caves are carved so high in the cliff also needs investigation.
There can be several reason for it, such as
1) The space to carve the caves at lower level was already occupied by the Caves 4,5,6. Hence the cave 2,3 may have been carved at the higher level for the want of the space.
2) There are 2 longitudinal natural cracks (defects) in the cliff at the lower level. The cave 2,3 may have been carved at higher level to avoid these longitudinal natural cracks. This may have helped in ensuring that the cave 3 remains waterproof.
3) The cave mau have been carved at higher elevaion for seclusion or for security.
 

 

 
24. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
25. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
26. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
27. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
28. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
29. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
30. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
32. Cave # 3 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
33. Cave # 7 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक ७ : लेणी क्रमांक ५ च्या वर उंचावर कड़्यात एक आयताकृती कोरीव काम दिसते. या लहान लेणीत जाणे अवघड आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात भिंत नाही. आत एक कोनाडा आहे. लेणीचा आकार अंदाजे २.५ मीटर रुंद आणि १.२ मीटर आत लांब आहे.
Excavation#7
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, Above the excavation #5, at the elevated level.
Description: Excavation#7 is a small cave cut in the cliff, at the elevated level above the ground. The excavation is not easily acessible. The cave is approximately 2.5 m wide, 1.2 meter deep and has a small recess (niche) in its backwall. depth. There are no symbols or inscriptions in this cave.
 

 

 
34. Cave # 7 on cliff, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
35. Cave # 4,5,6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
36. Cave # 5 Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
37. Cave # 4,5 Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
38. Cave # 4,5 Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
39. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक ४ : लेणी क्रमांक ४ लेणी क्रमांक ३ च्या खाली जमिनीलगत आहे. या ठिकाणी बाहेरची माती आत आली असल्याने जमिनीवरच्या खाणाखुणा नीट दिसत नाहीत. बाहेर एक लहान ओसरी आहे. ओसरीत एका बाजुला एक मोडका कोनाडा आहे. समोरच्या बाजूची भिंत दरवाजाच्या आजूबाजूला मोडली आहे. आत प्रशस्त दालन आहे. दालनाची रुंदी ५.६ मीटर, लांबी ६.६ मीटर आणि उंची २.२ मीटर आहे. उत्तरेकडील भिंतीत अजुन एक दरवाजा आहे. त्या दरवाजातून पलिकडे लेणी क्रमांक ५ मध्ये जाता येते. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन रुंद बाक आहेत. बाक अंदाजे १ मीटर रुंद, २ मीटर लांब आहेत. नंतरच्या काळात गुरे बांधुन ठेवली असावीत. त्याच्या खुणा भिंतींवर आणि छतात दिसतात. नंतरच्या काळात लेणीचा वापर गुरे बांधण्यासाठी झाला असावा. बांधण्या छतावर आणि भिंतींवर कोरलेल्या दिसतात.
Excavation#4
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, north of the Excavation#2, at the ground level.
Description: Excavation#4 is a rock cut cave at ground elevation in the cliff. The cave is easily acessible. The cave has a verandah, which is partly broken. There are signs of a small recess in the side wall in the verandah. The verandah does not have front wall. The cave is a large hall, and is approximately 6.6 m wide and 5.6 meter deep with 2.2 m height to ceiling. The front wall of the cave is partly broken. There is a doorway on the north side wall of the cave and it opens in to the next cave (excavation#5). There are two large benches on either side of the doorway in excavation#4. These large benches are approximately 1 meter deep and 2 meter wide. There are no symbols or inscriptions in this cave.
 

 

 
40. Cave # 4,5,6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
41. Cave # 4,5,6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
42. Cave # 4,5,6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
43. Cave # 4,5,6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
44. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
45. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
46. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
47. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
48. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
49. Cave # 4, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
50. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक ५ : लेणी क्रमांक ५ लेणी, क्रमांक ४ च्या लगत उत्तरेकडे आहे. या ठिकाणी बाहेरची माती आत आली असल्याने जमिनीवरच्या खाणाखुणा नीट दिसत नाहीत. बाहेर एक लहान ओसरी आहे. लेणीला समोरच्या बाजूची भिंत नाही (कदाचित मोडली आहे.) आत प्रशस्त दालन आहे. दालनाची रुंदी ८.२ मीटर, लांबी ८.५ मीटर आणि उंची २ मीटर आहे. नंतरच्या काळात येथे गुरे बांधुन ठेवली असावीत. त्याच्या खुणा भिंतींवर आणि छतात दिसतात. या मुख्य दालनाच्या मागच्या बाजुच्या भिंतीत एक लहान कक्ष (विहार) आहे. ता विहाराची रुंदी ४.१ मीटर, आत लांबी ३.८ मीटर आणि उंची १.८ मीटर आहे. या विहाराच्या दरवाजाच्या बाजूस एक लहान आयताकृती फट (खिडकी) कोरली आहे. बाहेरील मुख्य दालनाच्या मध्ये एक भिंत नंतरच्या काळात बांधलेली दिसते. यामुळे या दालनाचे दोन भाग झालेले आहेत. दालनाच्या दक्षिण भिंतीत असलेल्या दरवाजातुन लेणी क्रमांक ४ मध्ये प्रवेश करता येतो.
Excavation#5
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, adjascent to the Excavation#4 towards north, at the ground level.
Description: Excavation#5 is a rock cut cave at ground elevation in the cliff. The cave is easily acessible. The cave has a verandah, which is partly broken. The verandah does not have front wall. The cave is a large hall, and is approximately 8.2 m wide and 8.5 meter deep, with 2 m height to ceiling. The front wall of the cave is partly broken. There is a doorway on the south side wall of the cave and it opens in to the adjascent cave (excavation#4). Excavation#5, cave hall is divided in to two parts using a rock amd mortar wall. At the back wall of this cave hall, there is a cave cell, which is approximately 4.1 m wide, 3.8 m deep with doorway which is approximately 1.8 meter in height and 1 meter in width. This small inner cave has horizontal slit cut in its front wall. The slit is approximately 0.6 m wide and 0.2 m in height. Also the doorway to the adjacent cave (excavation#4) is also 1m wide. There are no symbols or inscriptions in this cave.
 

 

 
51. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
52. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
53. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
54. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
55. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
56. Cave # 5, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
57. Cave # 6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
लेणी क्रमांक ६ : लेणी क्रमांक ६, लेणी क्रमांक ५ च्या लगत उत्तरेकडे आहे. या ठिकाणी बाहेरची माती आत आली असल्याने जमिनीवरच्या खाणाखुणा नीट दिसत नाहीत. बाहेर एक लहान ओसरी आहे. लेणीला समोरच्या बाजूची कोरीव भिंत ठराविक ऊंची पर्यंत आहे. त्याच्या वरचा भाग दगडी बांधकाम करुन छतापर्यंत नेला आहे. आत प्रशस्त दालन आहे. येथे आतली जमिन खालच्या पातळीत खणलेली असल्याने यात पावसाळ्यात पाणी साठते. दालनाची रुंदी ९.५ मीटर, लांबी ४.४ मीटर आणि उंची २ मीटर आहे. या दालनाच्या मागच्या आणि दक्षिणेकडील भिंतीत लहान चौकोनी खाचांची एक रांग आहे.
Excavation#6
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, adjascent to the Excavation#5 towards north, at the ground level.
Description: Excavation#6 is a rock cut cave or a cistern at ground elevation in the cliff. The excavation is easily acessible. The excavation does not have full front wall. The front wall is limited to 1 meter height. Above this rock cut front wall there is a wall made of rock and mortar. The excavation is approximately 9.5 m wide and 4.4 meter deep. The excavation has square shaped equidistant sockets cut on its back wall and side walls. There are no symbols or inscriptions in this cave. This excavation seems as if it is a water cistern.
 

 

 
58. Cave # 6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
59. Cave # 6, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
60. Water cistern # 8, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
61. Water cistern # 8, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
पाण्याची टाकी क्रमांक ८ : या लेणी समूहात एक भव्य आकाराची भूमिगत पाण्याची टाकी आहे. टाकी लेणी क्रमांक ६ च्या उत्तरेस आहे. येथे जमिन थोडी उंचावते. डगरीवर चढल्यावर आपण या टाकीच्या मुखाशी पोहोचतो. नैसर्गिक भेग छताच्या पातळीत घेऊन येथे टाकी त्याच्या खाली कोरली आहे. नैसर्गिक भेगेचा वापर नेहेमी टाकीच्या छतासाठी घेतला जातो याचे हे छान उदाहरण आहे. यामुळे टाकीत पाणी राहते. जर टाकी नैसर्गिक भेगेच्या वर कोरली तर साहजिकच भेगेतुन पाणी निघुन जाईल आणि टाकीत पाणी राहणार नाही. टाकीचे मुख लहान असुन टाकी खोल आहे. टाकीचा आकार अंदाजे ४.५ मीटर रुंद ९ मीटर आत लांब आणि २.६ मीटर उंच आहे. मुखापासून आत अंदाजे ६.७ मीटर अंतरावर दोन खांब आहेत. खांबांच्या दोन बाजूस टाके अजुन खोल खणलेले आहे. पावसाळ्यात टाकी पूर्ण भरते. या टाकीत अंदाजे १.२ लाख लिटर पाणी मावते. आज सुद्धा या पाण्याचा वापर होतो.
Excavation#8
Location: Cluster 1, Lohagadwadi Caves, North of excavation #6, at the ground level.
Description: Excavation#8 is a large underground rock cut cistern at ground elevation in the cliff. The excavation is easily acessible. The water cistern is approximately 4.45 m wide, 9 meter in breadth and has 2.6 m vertical depth. The entrance opening of the water cistern is approximately 2.17 m wide. There are two pillars in the water cistern at approximately 6.7 meter distance from the front. There was ample amount of water in this water cistern in May 2019. There are no symbols or inscriptions in this cave
 

 

 
62. Water cistern # 8, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
63. Overall layout wrt elevation, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
64. Dress code, Cluster 1, Lohagadwadi Caves, Maval Taluka, Pune district, Maharashtra, India
 
 
 
References :
1. Gazetters of Bombay Presidency, Pune District, Volume XVIII, 1885.
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com